नांदुरा: रानडुकराने घेतला दुचाकीस्वाराचा बळी;आडवे आल्याने अपघात : खंडाळा फाट्यावरील दुर्घटना
रानडुक्कर आडवे आल्याने एका दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू झाला. खंडाळा फाट्यावर २८ ऑक्टोबरला रात्री पावणेनऊच्या सुमारास ही दुर्घटना घडली.गजानन बाजीराव वक्टे (वय ५०) असे मृताचे नाव आहे.वडाळी येथील रहिवासी असलेले वक्टे हे मोताळ्यावरून दुचाकीने घराकडे निघाले होते.खंडाळा फाट्यावर अचानक रस्त्यावर रानडुक्कर आडवे आले.त्यामुळे त्यांची दुचाकी अनियंत्रीत झाली. या अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाली.त्यात त्यांचा मृत्यू झाला.