जालना शहरात भरधाव वेगाने धावणार्या दुचाकीमुळे झालेल्या अपघातात मेडिकल मार्केटिंग व्यवसाय करणार्या युवकास गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली आहे. सोमवार दि. 15 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात जखमी झालेल्या युवकावर सध्या जालना क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मोहम्मद सरफराज मोहम्मद सत्तार (वय 35, व्यवसाय मेडिकल मार्केटिंग, रा. रहमानगंज, ता. जि. जालना) यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार,ते स्वस्तिक बाल रुग्णालयातील मेडिकलमधून निघाले होते.