वसंतपंचमी निमित्ताने दरवर्षी आयोजित होणाऱ्या पिंपळगावच्या बैलांच्या 101 व्या शंकरपटाच्या नियोजनासाठी आज, सोमवार दिनांक 8 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता ग्रामपंचायत कार्यालय पिंपळगाव/सडक येथे सरपंच श्री श्यामभाऊ शिवणकर यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन सभा उत्साहात पार पडली. दि. 23, 24, व 25 जानेवारी 2026 रोजी शुक्रवार, शनिवार व रविवार या तीन दिवशी भरणार आहे.