राहुरी: वळण -पिंप्री मुळा नदीवरील पूल पाण्याखाली दोन गावांचा संपर्क तुटला
राहुरी तालुक्यातील पूर्व भागातील वळण पिंपरी येथील मुळा नदीवरील पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. शनिवारी रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने मुळा नदीला पूर आला आहे. त्याचबरोबर मुळा धरणातून देखील पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने हा पुल पाण्याखाली गेला आहे.