इंदापूर: इंदापूर तालुक्यात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर महसूल प्रशासनाचा दणका; सहा बोटी जिलेटिनने उडवल्या...
Indapur, Pune | Oct 18, 2025 उजनी धरण परिसरात अवैध वाळू उपसा करणाऱ्या माफियांविरुद्ध महसूल प्रशासनाने पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई करत सहा फायबर बोटी जिलेटिनच्या साहाय्याने उध्वस्त केल्या. ही कारवाई शुक्रवारी (ता. 17) तालुक्याच्या माळवाडी व शहा गावांच्या हद्दीत करण्यात आली. महसूल प्रशासनाच्या या निर्भीड पावलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.