बुलढाणा: फलटण येथील डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी,शिवसेना उबाठाने दिले निवेदन
सातारा जिल्ह्यातील फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकारी डॉ.संपदा मुंडे यांनी आत्महत्या केल्याची घटना संपूर्ण राज्याला हादरवणारी आहे.पोलीस निरीक्षक गोपाल बदने यांच्याकडून बलात्कार तसेच प्रशांत बनकर व इतरांकडून मानसिक व शारीरिक छळ झाल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत.या आत्महत्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी बुलढाणा जिल्हा शिवसेना उबाठा महिला आघाडीच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे करण्यात आली आहे.