राहुरी: कापूस व्यापाऱ्यांच्या काही काट्यांमध्ये तफावत,दोन किलो घट धरू नये, शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष मोरे यांचा इशारा
राहुरी तालुक्यामध्ये काही कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या वजन काट्यामध्ये तफावत आढळून येते व शेतकऱ्यांकडून सरसकट दोन किलो घट धरल्या जाते, त्यामुळे ही दोन किलो घट धरू नये तसेच तफावत आढळणा-या काट्यांवरील व्यापाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा,अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी दिला असून त्यांनी आज शनिवारी दुपारी नायब तहसीलदार संध्या दळवी यांना याबाबतचे निवेदन दिले आहे.