राहुरी: पिंपरी अवघड ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी शिवाजी लांबे बिनविरोध
राहुरी तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या पिंपरी अवघड ग्रामपंचायतीत उपसरपंचपदी शिवाजी सोपान लांबे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच मिनाक्षी लांबे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंगळवारी पार पडलेल्या बैठकीत ही निवड संपन्न झाली आहे.ग्रामसेवक शुभांगी चोखर, क्लार्क कृष्णा कांबळे, संजय वाघमारे यांनी निवड प्रक्रियेस सहकार्य केले.