जालना: जालना-सिंदखेड राजा रस्त्यावर कार-बस अपघात; वीजपुरवठा खंडित असल्याने मोठा अनर्थ टळला
Jalna, Jalna | Feb 1, 2026 जालना ते सिंदखेड राजा रस्त्यावर रविवार दि. 1 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 6.30 वाजेच्या सुमारास बोरखेडे पाटी परिसरात भीषण अपघात झाला. या अपघातात एक कार आणि प्रवासी बसची धडक झाली आणि बस विद्युत पुरवठा करणार्या रोहित्रावर जावून धडकली. सुदैवाने अपघाताच्या काही मिनिटे आधीच त्या भागातील वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला असून अन्यथा परिस्थिती अधिक भयावह झाली असती, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या अपघातात एमएच 21 ए एक्स 282 क्रमांकाची स्पोर्ट्स कार आणि यवतमाळहून येणारी बस होती.