धुळ्यातून एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. शहरातील विश्वकर्मा नगर परिसरात एका ८० वर्षीय वृद्धाने अवघ्या अडीच वर्षांच्या चिमुकलीसोबत लैंगिक छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.