वर्धा: ओल दुष्काळ:शेतकऱ्यांसाठी हेक्टरी ₹१लाख अनुदन द्या;कर्जमाफी करा,काँग्रेसने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांन निवेदन दिले
Wardha, Wardha | Sep 27, 2025 नैसर्गिक आपत्ती व सरकारी अनास्थेमुळे सध्या शेतकरीवर्ग मेटाकुटीस आला एकीकडे अस्मानी संकटामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले, तर दुसरीकडे सरकारकडून पुरेशी मदत मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला. याच पार्श्वभूमीवर, राष्ट्रीय काँग्रेसच्या वर्धा जिल्हा कार्यकारणीने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी ओला दुष्काळ राष्ट्रीय आपत्ती म्हणून जाहीर करण्याची मागणी केली असून, शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळवण्यासाठी जिल्हाधिकारी यांना नुकतेच निवेदन दिले असे 27 सप्टें रोजी सायं 7वाजत प्रसिद्धीस दिले.