परभणी: फोटो वरून ब्लॅकमेल करत असेल तर तक्रार करा, एस पी रवींद्रसिंह परदेशी यांचे पोलीस अधीक्षक कार्यालयात आवाहन
कुणी एआय किंवा अन्य कशाच्या मदतीने फोटो मार्फ करून ब्लॅकमेल करत किंवा छळत असेल तर तात्काळ पोलिसांशी संपर्क साधा असे आवाहन पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी रविवार दिनांक 5 ऑक्टोबरला दुपारी दोनच्या सुमारास केले. सेलू घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले.