राहुरी: नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून मदत मिळावी, शेतकरी सेनेचे तहसील आवारामध्ये आंदोलन.
राहुरी तालुक्यामध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून हेक्टरी एक लाख रुपयांची मदत शेतकऱ्यांना मिळावी या मागणीसाठी शिवसेना प्रणित शेतकरी सेनेने राहुरी तहसील आवारात येत ठिय्या आंदोलन केले. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी या ठिकाणी हे आंदोलन करत तातडीने पंचनामे करावे अशी मागणी केली. आज मंगळवारी सकाळी हे आंदोलन करण्यात आले.