जालना: नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या याद्या दोन दिवसात अपलोड करा, अन्यथा कारवाई : जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे आदेश
Jalna, Jalna | Nov 1, 2025 जालना जिल्ह्यातील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकर्यांना तत्काळ मदत मिळावी, यासाठी नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या याद्या येत्या रविवार दि. 2 नोव्हेंबर पर्यंत ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी सर्व मंडळ अधिकार्यांना ही सूचना दिली होती, त्यानंतर शनिवार दि. 1 नोव्हेंबर 2025 रोजी सांयकाळी 6 वाजेपासुनच याद्या अपलोड करण्यास सुरुवात झाली.