संगमनेर: रायतेवाडी फाट्यावर भीषण अपघात : कंटेनर थेट हॉटेल दिव्यांकामध्ये घुसले
रायतेवाडी फाट्यावर भीषण अपघात : कंटेनर थेट हॉटेल दिव्यांकामध्ये घुसले संगमनेर तालुका | रायतेवाडी फाटा येथे मंगळवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास भीषण अपघात घडला. मिसळ आणि मासोळीच्या प्रसिद्ध हॉटेल दिव्यांकामध्ये एक कंटेनर घुसल्याने मोठे नुकसान झाले. नेहमीप्रमाणे हॉटेल चालक दत्तात्रय रंगनाथ मांडेकर हे झोपेत असताना, थोडक्यात बचावले. कंटेनर (क्रमांक HR 55 AT 2926) चालकाला झोप लागल्यामुळे वाहन रस्त्याबाहेर जाऊन थेट हॉटेलमध्ये धडकले.