यवतमाळ: शहरात देवी विसर्जनाच्या तोंडावर विसर्जन स्थळे अस्वच्छ
आजपासून देवी विसर्जनाला सुरुवात झाली असताना, स्थानिक नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्या अनास्थेमुळे शहरातील प्रमुख विसर्जन स्थळे (विहिरी आणि टाके) अद्यापही साफ करण्यात आलेली नाहीत. विहिरींच्या पाण्याला दुर्गंधी येत असून, यामुळे देवीच्या विसर्जनावेळी धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याचा आरोप गुरुदेव युवा संघाने केला आहे.