वैजापूर: नगर परिषदेच्या सभागृहात निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्षांची बैठक
वैजापूर नगर परिषदेच्या सार्वजनिक निवडणुकीच्या अनुषंगाने वैजापूर नगर पालिकेच्या सभागृहात राजकीय पक्षांची बैठक पार पडली.या बैठकीत आचार संहितेचे पालन सर्व राजकीय पक्षांनी करावे अशी सूचना देण्यात आली.तसेच निवडणूक कार्यक्रम बाबत माहिती देण्यात आली.दरम्यान प्रसंगी दुबार मतदार बाबत उपस्थित राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारला ज्यावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दुबार नाव ज्यांचे आहे त्यांचे हमीपत्र घेऊनच मतदान केले जाईल असे उत्तर दिले.