लाखनी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या जांभळी बीटमध्ये आज तब्बल दहा फूट लांबीचा महाकाय अजगर आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती मिळताच साकोली वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ हालचाली करत सर्पमित्र आकाश बारसागडे यांच्याशी संपर्क साधला. आकाश बारसागडे यांनी घटनास्थळी धाव घेत अत्यंत कौशल्याने या अजगराला कोणतीही इजा न पोहोचवता सुरक्षितरीत्या जेरबंद केले. पकडलेल्या या अजगराला वनविभागाच्या देखरेखीखाली जांभळी बीटमधील सुरक्षित जंगल शिवारात नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आल