चाळीसगाव: जय महाराष्ट्र! मनसेच्या आंदोलनाच्या इशाऱ्याला यश!
चाळीसगाव नगरपालिकेची तत्काळ दखल; पाटणादेवी रोडवरील स्मशानभूमीची साफसफाई चाळीसगाव: (दि. ०२ नोव्हेंबर २०२५) चाळीसगाव शहरवासियांच्या मूलभूत सुविधांसाठी लढणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) आंदोलनाच्या इशाऱ्याची दखल घेत नगरपालिकेने त्वरित कार्यवाही केली आहे. मनसे शहराध्यक्ष शैलेश मोरे यांनी दोन दिवसांपूर्वी चाळीसगाव नगरपालिकेला निवेदन देत पाटणादेवी रोड परिसरातील स्मशानभूमीच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले होते