पुणे शहर: कोथरूडमध्ये घरफोडी करणाऱ्या चोरट्यांचा तरुणावर हल्ला, मारहाणीत तरुण गंभीर जखमी
Pune City, Pune | Sep 29, 2025 कोथरूड भागातील राहुलनगर सोसायटीत रविवारी पहाटे शिरलेल्या चोरट्यांनी सदनिकेत शिरून एका तरुणावर हल्ला केला. चोरट्यांनी तरुणाच्या डोक्यात गज मारल्याने तो गंभीर जखमी झाला. या घटनेत आदित्य हेमंत ढवळे हे गंभीर जखमी झाले आहेत. ढवळे यांनी याबाबत अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली