यावल येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयात जळगाव जिल्ह्याभरातील आदिवासी समाज बांधवांनी एकत्र येऊन वन हक्क जमिनीसाठी मंजूर वनदावे यातील कमी दिलेले क्षेत्र पूर्ण मिळावे यासाठी आंदोलन करण्यात आले सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत आंदोलकांची प्रशासनाच्या वतीने चर्चा सुरू होती. आंदोलन अजूनही प्रकल्प कार्यालयात आपल्या इतर मागण्यांसाठी ठाण मांडून बसले आहे.