गोंदिया: ४८ तासांत ३० किलो चांदीसह आरोपी जेरबंद
शहर पोलिसांची मोठी कामगिरी : गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त
Gondiya, Gondia | Sep 22, 2025 शहरातील सोन्या-चांदीच्या व्यापारात खळबळ उडवणाऱ्या अफरातफर प्रकरणाचा उलगडा गोंदिया पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत करीत आरोपीला जेरबंद केले आहे. पोलिसांनी ३० किलो चांदी किंमत ३८ लाख रुपये आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण ३८ लाख ३० हजार रुपयांचा माल जप्त केला. रोहित रमेश सोनी (३६) रा. रामनगर यांचे दुर्गा चौक येथे ‘रोहित ज्वेलर्स’ नावाचे दुकान आहे. त्यांनी राजकोट (गुजरात) येथील थ