जालना: पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी शहरातील अतिवृष्टीग्रस्त भागांची व शेतकर्यांच्या बांधावर जावून केली नुकसानीची पाहणी
Jalna, Jalna | Sep 17, 2025 पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी बुधवार दि. 17 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता जालना शहरातील अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी केली असून शेतकर्यांच्या बांधावर प्रत्यक्ष जाऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. सततच्या पावसामुळे उभी पिके जमीनदोस्त झाली असून शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. मात्रेवाडी येथील शेतकरी जनार्धन मात्रे यांच्या शेतावर भेट देऊन पालकमंत्रींनी त्यांच्याशी संवाद साधत झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेतली. शासन नुकसानग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे असे म्हटले.