पुणे शहर: संत निरंकारी सत्संग भवनाजवळ बिबवेवाडी पोलिसांची धडक कारवाई, गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूसासह तरुण अटक
Pune City, Pune | Sep 30, 2025 बिबवेवाडी पोलिसांनी गस्ती दरम्यान केलेल्या कारवाईत गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूसासह एका तरुणाला रंगेहात पकडण्यात आले.आरोपीचे नाव अतुल सुनील चव्हाण (वय २६, रा. बिबवेवाडी) असे आहे. पोलीस अंमलदार सुमित ताकपेरे व विशाल जाधव यांना खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने संत निरंकारी सत्संग भवनाजवळ ही कारवाई करण्यात आली