शहर पोलिस ठाण्यांतर्गत कुंभारेनगर परिसरातील नाना चौकात राजकुमार श्रावण वैद्य (५६, रा. नानाचौक, कुंभारेनगर) यांनी राहत्या घरी सिलिंग फॅनला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. गुरुवारी (दि.१५) सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजतादरम्यान हा प्रकार घडला आहे. फिर्यादी संदीप राजकुमार वैद्य (३५) यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तपास महिला हवालदार लिल्हारे करीत आहेत.