धुळे शहरातील राजवाडे बँक ते श्रीराम पेट्रोल पंपदरम्यानच्या काँक्रीट रस्त्याच्या कामावरून राजकीय वाद पेटला आहे. ठाकरे गट शिवसेनेने या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत सत्ताधारी, प्रशासन आणि ठेकेदारावर निशाणा साधला. अवघ्या एक कोटींच्या कामाचे अंदाजपत्रक साडेसात कोटींवर फुगवून निकृष्ट साहित्य वापरल्याने रस्ता काही आठवड्यांतच उखडल्याचा आरोप करत या प्रकरणाची चौकशीची मागणी करण्यात आली.