रामटेक: मित्रपक्षाचा युतीचा प्रस्ताव आल्यास विचार करु : माजी आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांची पत्रपरिषदेत माहिती
Ramtek, Nagpur | Oct 15, 2025 स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत युती करणे हे स्थानिक पातळीवर ठरवले जाईल अन्यथा मैत्रीपूर्ण लढू . अशा स्थितीत रामटेक, पारशिवणी तालुक्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीचा घटक मित्रपक्षाकडून अद्याप युतीचा प्रस्ताव आलेला नाही. आल्यास त्यावर विचार करुन तो प्रस्ताव भाजपा वरिष्ठांकडे पाठवून त्यावर निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती भाजपाचे माजी आ. डी मल्लिकार्जुन रेड्डी यांनी बुध. दि. 15 ऑक्टोबर ला सायं 5 वा भाजपा कार्यालय रामटेक येथे आयोजित पत्र परिषदेत दिली.