बार्शी: “अतिवृष्टीत वाहून गेलेल्या सचिन लांडेंचा जानपूर तलावात मृतदेह”; गावात शोककळा”
बार्शी तालुक्यातील पांगरी गावातून आठ दिवसांपासून बेपत्ता असलेला तरुण जहानपूर शिवारातील तलावाच्या कडेला पाण्यात मृतावस्थेत आढळून आला . सुहास ऊर्फ सचिन शत्रुघ्न लांडे (वय ४०, रा. पांगरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबतची माहिती मृताचे मेहुणे दीपक विजय शेळके यांनी ३० रोजी रात्री १० च्या सुमारास दिली आहे. याबाबत पांगरी पोलिसात नोंद झाली असून त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, असा परिवार आहे.