गोरेगाव: स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत सोनी येथे आरोग्य शिबिराचे आयोजन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून सेवा पखवाडा सुरू करण्यात आला.२ ऑक्टोबर २०२५ पर्यंत सुरू राहील.या अंतर्गत विविध अभियान राबवण्यात येत असून स्वस्थ नारी सशक्त परिवार कार्यक्रमांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र सोनी येथे भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या वेळी क्षेत्रातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून विविध तपासणी केली. यावेळी माजी जि. प. अध्यक्ष पंकज रंहागडाले, पं.स.सदस्य किशोर पारधी, सरपंच हेमेश्वरीताई हरीणखेडे, उपसरपंच झनलाल चव्हाण उपस्थित होते.