राहाता: रामपूरवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात 2 शेळ्या ठार तर एक जखमी...
राहाता तालुक्यातील रामपूरवाडी येथे बिबट्यांना दोन शेळ्या फस्त केल्या असून एका शेळीला जखमी केल्याने शेतकऱ्याचं नुकसान झालंय. सध्या बिबट्यांचा मानव वस्तीकडे मुक्त संचार वाढत चालला असून शेतकऱ्यांना चांगलाच मोबदला चुकवावा लागतोय. शेतकऱ्यांच्या पाळीव कुत्र्यांसह आता बिबट्यांनी जनावरांनाही आपला भक्ष बनवण्यास सुरुवात केलीय.