वनविभागात वनरक्षक पदी सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष देऊन लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका आंतरजिल्हा टोळीला पकडण्यात रामटेक पोलिसांना यश आले आहे.ही टोळी सरकारी नोकरीचे बोगस नियुक्तीपत्र देऊन सरकारी रबर स्टॅम्पचाही वापर करीत होती. या प्रकरणात रामटेक पोलिसांनी रामटेक तहसील कार्यालय व बस स्टँड चौक रामटेक येथे कारवाई करीत तीन आरोपींना अटक केली असून दोन आरोपींचा शोध घेत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अरविंदकुमार कतलाम यांनी बुधवार दिनांक 31 डिसेंबरला रात्री नऊ वाजता च्या दरम्यान दिली.