अंबड भागातील दत्तनगर येथून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची घटना दिनांक 28 नोव्हेंबर रोजी घडली असून 29 नोव्हेंबर रोजी दुपारी सव्वाचार वाजता अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 30 नोव्हेंबर रोजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांची 17 वर्षे अल्पवयीन मुलगी हीला दत्तनगर पाण्याच्या टाकी जवळून अज्ञात इसमाने काहीतरी आमिष दाखवून पळून नेले. तिची सर्वत्र आजूबाजूला मैत्रिणीकडे शोध घेतला असता ती आढळून आली नाही. पोलीस हवालदार सोनवणे या प्रकरणी पुढील तपास करीत आहे.