जाफराबाद: वाढोणा येथे पाझर तलावात पोहायला गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू
आज दिनांक 14 ऑक्टोंबर 2025 वार मंगळवार रोजी दुपारी 2वाजेच्या सुमारास जाफराबाद तालुक्यातील वाढवणा येथे पाझर तलावात पोहायला गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे दुपारच्या सुमारास शाळा करून घरी आल्यानंतर ही दोन्ही चिमुकले गाव परिसरात असलेल्या पाझर तलावात पोहायला गेले व या पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला, यामध्ये कुणाल कृष्णा आढे व 13 वर्ष व ओम गणेश आढे 11 वर्ष असे चिमुकल्यांची नावे आहे. याप्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात आकस्मित मूर्तीची नोंद करण्यात आली.