उमरखेड: ढाणकी रोड येथे पैसे मागितल्याने एकास मारहाण ; उमरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अहबाब कॉलनी येथील शेख फरीद यांनी आपली दोन जनावर शेख इमरान उर्फ इम्मू वय 27 राहणार जाकीर हुसेन वॉर्ड याला दिले होते. त्यांनी ती जनावरे विकल्यानंतर विक्रीचे आलेले 32 हजार रुपये शेख फरीद याला देणे गरजेचे होते मात्र ते पैसे त्यांनी दिले नाही म्हणून शेख फरीद याने शेख इरफान यांच्याकडे पैशाची मागणी केली असता शेख इमरान याने पैसे न देता उलट त्यांच्या डोक्यावर तराजू मारून जखमी केल्याची घटना घडली असल्याची माहिती पोलिसांकडून 10 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता प्राप्त झाली आहे.