जालना शहरातील नोंदणीकृत तसेच जुनी परंतु, नोंदणीकृत नसलेल्या सर्व झोपडपट्ट्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा, यासाठी आमदार अर्जुनराव खोतकर यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात ठोस मागणी केली. गुरुवार दि. 11 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यातील 42 नोंदणीकृत झोपडपट्ट्यांबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नावर सरकारने सकारात्मक भूमिका घेतली असून काही ठिकाणी लाभ न मिळाल्याने झालेल्या तक्रारींकडेही खोतकर यांनी लक्ष वेधले.