जालना: नदीला पूर आल्याने अंत्यविधी रस्त्यावरच करण्याची वेळ; जालन्यतील पाथरुड येथील घटना; पूरग्रस्त परिस्थितीने उभा केला प्रश्न
Jalna, Jalna | Sep 22, 2025 तालुक्यातील पाथरूड येथे अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे एक हृदयद्रावक घटना घडली. या गावातील रहिवासी रमेश दगडुबा भगुरे (वय 45) यांचे दीर्घ आजारानंतर निधन झाले. परंतु त्यांच्यावर अंत्यविधी करण्यासाठी स्मशान भुमीपर्यंत जाता आले नाही. त्यामुळे त्यांच्या पार्थिवावर रस्त्यावरच अंत्यविधी करण्याची वेळ आली.सोमवार दि. 22 सप्टेंबर 2025 रोजी दु.3 वाजेच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आला.तत्पुर्वी अंत्यविधीसाठी कुटुंबीय आणि नातेवाईकांनी स्मशानभुमीपर्यंत जाण्याचे प्रयत्न केला.