कृषी उत्पन्न बाजार समिती रामटेकच्या नवीन विकास आराखड्याला पणन महासंघाची मंजुरी मिळाली असून लवकरच काही प्रस्तावित कामे प्राधान्याने सुरू करण्यात येणार असल्याची माहिती कृ. उ.बा. समिती रामटेकचे सभापती सचिन किरपान यांनी गुरुवार दिनांक 1 जानेवारीला दुपारी दोन वाजता बाजार समितीचे सभागृह रामटेक येथे आयोजित पत्र परिषदेत दिली. यावेळी नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे अनावरण ही अतिथींच्या हस्ते करण्यात आले.