पोलीस ठाणे एम.आय.डी. सी. हद्दीत, अॅटो कनेक्ट गॅरेज समोर, बोस्टन कॅफे चे विरूध्द बाजुस, हिंगणा रोड येथे एक अनोळखी ईसम वय अंदाजे ६० ते ६५ वर्षे वयाचे मृत अवस्थेत मिळुन आले. एमआयडीसी पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन मृतदेहाचा पंचनामा केला व शवविच्छेदनासाठी रुग्णात पाठवलेला आहे. याप्रकरणी फिर्यादी विश्व पारस मेहता, वय ३१ वर्षे, रा. न्यु कॉलोनी, सदर, नागपुर यांनी दिलेल्या सुचनेवरून पोलीस ठाणे एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.