जामखेड: पूरग्रस्त जनतेच्या पाठीशी खासदार निलेश लंके आणि आपला मावळा परिवार..!
गेल्या काही दिवसांतील अतिवृष्टीमुळे शेवगाव, पाथर्डी, कर्जत-जामखेड व नगर तालुक्यातील अनेक गावे मोठ्या प्रमाणात पूरग्रस्त झाली आहेत. या परिस्थितीत शनिवारी देवटाकळी, अंत्रे, ढोरसडे, शहर टाकळी, भावी निमगाव, बख्तर पूर, भातकुडगाव, गुंफा, हिंगणगाव आणि अमरापूर या शेवगाव तालुक्यातील गावांना भेट देऊन पूरग्रस्तांची व्यथा जाणून घेतली.