राष्ट्रभक्तीच्या विषयांवर व्याख्यानमालेचे आयोजन केले, लाभ सर्वांनी घ्यावा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये भारताचा जाज्वल्य इतिहास आणि देशासाठी समर्पणाची भावना रुजावी, पर्यावरण संवर्धनाची भावना जागृत व्हावी, या हेतूने ६ जूनपासून राज्यातल्या सर्व आयटीआय संस्थांमध्ये राष्ट्रभक्तीच्या विषयांवर व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे याचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन आज शुक्रवारी सकाळी ८ च्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.