आज दिनांक 11 मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेला C s R फंडमधून नवीन जेसीबी प्राप्त झाले असून आज महापौर वंदना मगरे आणि उपमहापौर राजेश राऊत यांच्या हस्ते या जेसीबीचे पूजन करण्यात आले. यावेळी नगरसेवक अक्षय गोरंट्याल, अतिरिक्त आयुक्त अर्जुन गिराम, नगरसेवक अमोल ठाकूर तसेच नगरसेवक महावीर ढाक्का आदी मान्यवर उपस्थित होते. जालना महानगरपालिकेकडे स्वतःची जेसीबी उपलब्ध नसल्यामुळे शहरातील स्वच्छता व इतर कामांसाठी भाड्याने जेसीबी घ्यावी लागत होती. मात्र आता C