ग्रामीण संस्कृतीचे प्रतीक आणि शेतकऱ्यांच्या अस्मितेचा विषय असलेल्या पारंपरिक 'पट' (बैलगाडा शर्यत) स्पर्धेचा थरार भंडारा जिल्ह्यातील सेलोटी येथे सुरू झाला आहे. १६ जानेवारी रोजी दुपारी दोन वाजल्यापासून या ऐतिहासिक पटाला उत्साहात प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी मैदानात उतरलेल्या वेगवान बैलजोड्यांनी आपल्या चपळाईने आणि वेगाने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.