पेण: अखेर… हटवणे वाडीतील बेपत्ता झालेली चिमुकली सापडली
Pen, Raigad | Nov 14, 2025 पेण तालक्यातील हटवणेवाडी येथील किशोरी किरण महालकर ही चार वर्षाची चिमुरडी 12 नोव्हेंबर रोजी गावाच्या बाहेरून बेपत्ता झाली होती. गेली तीन दिवस हिला शोधण्यासाठी पोलीस यंत्रण व गुरुनाथ साठीलकर यांचे हेल्प फाऊंडेशन अथक प्रयत्न करत होते. दोन दिवसात जवळपास तीन डोंगर शोधून काढले. मात्र, किशोरीचा काही पत्ता लागत नव्हता.पोलीस अधीक्षक आंचल दलाल यादेखील या शोध मोहिमेमध्ये सामील झाल्या होत्या. अखेर शुक्रवारी सकाळी शोधमोहीम सुरु असतानाच तिसऱ्या डोंगराच्या वरच्या बाजूला ही चिमुरडी पोलिसांना आढळली.