दिग्रस: क्रीडा संकुलाजवळ विनापरवाना रेती वाहतूक करणाऱ्या ऑटोवर दिग्रस पोलिसांची कारवाई, ५२ हजाराचा मुद्देमाल जप्त
दिग्रस शहरातील क्रीडा संकुल परिसरात विनापरवाना रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या ऑटोवर दिग्रस पोलिसांनी दि. २१ नोव्हेंबर रोजी दुपारी सुमारे १२ वाजताच्या दरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत ऑटो चालकांवर विविध कलमांवय गुन्हे दाखल केले आहे. गोपनीय माहितीवरून पोलिसांनी ऑटो क्र. एमएच-२९/९६८१ ला क्रीडा संकुल जवळ थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये विनापरवाना रेती आढळून आली. या कारवाईत ५० हजार रुपये किमतीचा ऑटो आणि अंदाजे अर्धा ब्रास रेती किंमत २ हजार रुपये असा एकूण ५२ हजारांचा माल जप्त केल.