नेवासा: १३ गोवंश जातीच्या जनावरांची सुटका ; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
नेवासा तालुक्यातील सलाबतपूर परिसरात कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेली १ लाख ४५ हजारांची गोवंश जातीच्या १३ जनावरे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून शनिवारी दि. ११ ताब्यात घेऊन सुटका केली. सलाबतपूर येथील दोघांविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.