साक्री: भरधाव वाहनावर पिंपळनेर येथे पोलिसांनी केली कारवाई
Sakri, Dhule | Nov 17, 2025 पिंपळनेर गावातील सामोडे चौफुलीजवळून भरधाव वेगाने वाहने जात असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. ही बाब लक्षात येताच पिंपळनेर पोलिसांनी या भागात गस्त सुरु केली होती. त्यात जीजे २१ व्ही ०१६८ क्रमांकाची अॅपेरिक्षा भरधाव वेगाने जाताना आढळून आली. त्यामुळे पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक पाटील यांच्या फिर्यादीवरुन रोशन नगर, पिंपळनेर येथील वाहनचालकविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश महाजन करीत आहे.