खोपोली नगर परिषद निवडणूक 2025 शांततामय, पारदर्शक आणि गैरप्रकारमुक्त पार पाडण्यासाठी रायगड जिल्हा पोलीस प्रशासन या निवडणुकीत अधिक कठोर आणि सक्रिय भूमिकेत उतरले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहुल व खोपोली पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी शहरातील सर्व प्रभागांना भेट देत निवडणूक यंत्रणेची सखोल पाहणी केली.