साक्री येथील दिव्यांग पत्रकाराला धमकी देऊन गैरवर्तन करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला त्वरित निलंबित करा अशी मागणी अखिल भारतीय मानवाधिकार संघ पिंपळनेर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अप्पर तहसीलदार मा.श्री.दत्तात्रय शेजुळ यांच्यामार्फत केली आहे. साक्री येथील दिव्यांग पत्रकार श्री. किशोर गादेकर यांना गुंडा सारखी धमकी देऊन गैरवर्तन करणारे साक्री पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री. महेश गायतड यांना त्वरित निलंबित करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.