सेलू: जामणी (पारधी) बेडा येथे महिलेस मारहाण; चौघांविरुद्ध सेलू पोलिसांत तक्रार दाखल
Seloo, Wardha | Nov 9, 2025 तालुक्यातील जामणी (पारधी) बेडा येथे चार जणांनी एका महिलेस मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी सौ. अश्विनी रवी काळे (वय ३१, रा. जामणी) यांनी सविता पवार, अक्षय पवार, मिथुन भोसले व पूजा भोसले (सर्व रा. जामणी) यांच्याविरुद्ध सेलू पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अशी माहिती ता. ९ ला सेलू पोलिसांकडून मिळाली.