जळगाव: जळगाव महापालिका निवडणुकीसाठी वंचित कडून इच्छुक उमेदवारांची मुलाखती: स्वबळावर लढवण्याची शक्यता
आगामी जळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापू लागले असून, वंचित बहुजन आघाडीने निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची जय्यत तयारी सुरू केली आहे. शनिवारी 27 डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता जळगाव येथे पक्षाच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी पक्षाने आपली भूमिका स्पष्ट करताना महाविकास आघाडीला एक प्रकारे इशाराच दिला आहे